बालपण खरंच खूप छान असतं
बालपण खरंच खूप छान असतं


बालपण खरंच खूप छान असतं
आयुष्यातील निखळ आनंदाचं पान असतं
असतात खरे रूसवे फुगवे
पण नसतात कधी हेवेदावे
नाही लागत कधी सोसावे
कर्तव्यांचे मोठाले हेलकावे
नसतात जबाबदारीची ओझी
ढीगभर आशा-आकांक्षा
मनसोक्त जगता येतं
चुकलं तरी मिळते लटकीच शिक्षा
बालपण खरंच खूप छान असतं
हसण्या बागडण्याला आलेलं उधाण असतं