बालकविता
बालकविता
इटुकले पिटुकले रे
उंदीर मामा लहान,
गणपती बाप्पांचे ते
आहेत गोड वाहन.
इवलासा जीव तुमचा
तरी करता बेजार,
दिवसरात्र धडपडत
घालता धिंगाणा फार.
इकडं तिकडं घरभर
पळत असतात रोज,
लपाछपी खेळण्याची
वाटते तुम्हास मौज.
कपडे अन् इतर वस्तू
कुरतडून करता फस्त,
पोटपूजा होते तुमची
होतो आम्ही खूप त्रस्त.
मनीमाऊ करता म्याव
जाता तुम्ही घाबरून,
हळूच एका बिळात
मग बसता हो लपून.
बाप्पांसोबत मिळतो
तुम्हालाही मोठा मान,
गंमत तुमची पाहताना
हरवून जाती मुले सान.
