STORYMIRROR

Smita Murali

Inspirational

4  

Smita Murali

Inspirational

बालकविता'मामाचं गाव'

बालकविता'मामाचं गाव'

1 min
3.6K


मामाचं गावं

मामा माझा ढब्बा ढोल
ढेरी वाढली गोल गोल
रंग शोभे गोरा गोरापान
राजबिंडा चेहरा खूपच छान

मामी माझी खूपच देखणी
मामाची आमच्या लाडाची राणी
मामी खाते हो खूपच भाव
भाच्यांची वाट पाही मामाचा गावं

पडक्या घराचा बनला बंगला
आज्जी मालकीन नाव विमला
मामाचं कुटूंब कसं अगदी छोटं
भाचे जमता होत किती मोठ

मामाचं गाव खेड्यातलं छान
फळा पिकांनी बहरलेलं रान
मामाच्या रानाजवळ ओढा वाहे
ओढ्याकाठी गणपती मंदिर आहे

खेडेगावात किती किती मज्जा
मामा माझा जसा मौजी राजा
मामी माझी बाई अशी सुगरणी
गुलाबजामुनची भरली बरणी

गावच्या बोरी, चिंचा न् कैरी
प्रेमळ तिथले सारे शेजारी
मामा आमचा हौशी हो भारी
मामाच्या गावाला निघाली स्वारी !

स्मिता मुराळी, सोलापूर


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational