बाळ
बाळ
बडबड करी छोटं बाळ
आजी म्हणे काळी तीट लाव
आजी डोलवते डोल डोल
छबुकडा माझा ढब्बूढोल
बांधे करगोटा कमरेला
जिवतीचा बदाम गळ्याला
शोभतात काळ्या मनगट्या
तोंडानी काढी सदा फुरक्या
छोटं बाळ सर्वांचा लाडोबा
लाड पुरवतात आजोबा
कडेवर घेऊन लाडाने
फिरवून आणती नेमाने
प्रेमळ आजी बाळासंगती
दिवसाचे तास पळताती
संध्याकाळी आईकडे जाई
भात खाऊन झोपून जाई
