बाजार
बाजार
बाजार खुला येथे, पण माणूस बंद आहे,
मज माणूस शोधण्याचा, भलताच छंद आहे।
कोणास हाक मारू, किंवा करू इशारा?
ही कोणती नशा ज्यात, हरेक धुंद आहे।
डोळे दिपून गेले, ही बघा रोषणाई...
अन् खोल अंतराचे आकाश मंद आहे।
एका क्षणात पडतो, पाऊस अत्तराचा
यारो इथे फुलांचा तो गंध कुंद आहे।
सारेच नेत्र मीनाक्षी, कोरीव काजळाचे
फुटके नशीब ऐसे की सारेच अंध आहे।
येथे शहाणपणाला बाजार मोल नाही
बुद्धी गहाण ठेऊन बहुतेक पंत आहे।
यावे खुशाल आता, चालून माझ्यावरती
हृदयात अमृताचा झरा जिवंत आहे।