बाबासाहेब...
बाबासाहेब...
अस्पृश्य-मागासलेल्यांची
'भिमाई' होते बाबासाहेब,
झिडकारलेल्या-होरपळलेल्यांची
'रमाई' होते बाबासाहेब
अलौकिक बुद्धिमत्तेचा
'स्पर्श' होते बाबासाहेब,
भारतातील पददलितांचे
'आदर्श' होते बाबासाहेब
आत्मविश्वासाचे तेज लाभलेले
'विश्वरत्न' होते बाबासाहेब,
राष्ट्रहिताच्या दुरदर्शिय तळमळीचे
'प्रयत्न' होते बाबासाहेब
दिर्घोद्योग-चिकाटी-मेहनतीचे
'वटवृक्ष' होते बाबासाहेब,
घटनात्मक प्रश्न सोडविणारे
'कल्पवृक्ष' होते बाबासाहेब
अज्ञानाकडून ज्ञानाकडे नेणारी
'दिशा' होते बाबासाहेब,
अन्यायाविरुद्ध संघर्षाची न्याय्य
'भाषा' होते बाबासाहेब
मनुस्मृतीला दहन करणारी
'आग' होते बाबासाहेब,
सामाजिक विषमतेला विरोध करणारे
'वाघ' होते बाबासाहेब
शिवाजी-फुले-शाहुविचारांचा
'जागर' होते बाबासाहेब,
करुणा-शील-प्रज्ञा-कर्तृत्वाचा
'सागर' होते बाबासाहेब
विद्वत्तेच्या लेखणीची ऐतिहासिक
'धार' होते बाबासाहेब,
भारतीय राज्यघटनेचे
'शिल्पकार' होते बाबासाहेब
अजून किती सांगू
काय होते बाबासाहेब,
शब्दही अपूर्ण पडतील
इतकं महान होते बाबासाहेब
