STORYMIRROR

Yogita Takatrao

Inspirational

3  

Yogita Takatrao

Inspirational

अस्तित्व

अस्तित्व

1 min
3.1K


वाट अस्तित्वाची चालताना खाच खळगे पुष्कळ

काटे रुततात अनेक पायांतून थेट हृदयात

रक्तबंबाळ करत एकमागोमाग चिरत जातात

हे टोचणं असं जिव्हारी पेलत चालत रहायचंय

अखंड आणि दूर त्या क्षितिजाकडे पोहचायचंय

आणि ठणकावून सांगायचयं आहे मी पण इथे


आहे माझही एक तेजोमयी स्व अस्तित्व

मी वेगळी माझ्या अस्तित्वाची वहिवाटही वेगळी

कशास तुलना हिची वाट अशी तिची तशी

जाऊ द्या ना मला माझ्या वाटेवरून स्वच्छंदपणे

का जाऊ इकडून आणि तिकडून ऐकुन सल्ले

चोखंदळ होऊन मला शोधायच्या आहेत माझ्या वाटा


येऊ देत ना वाटेत खडंतर रस्ते, काटे कूटे

मी काढेन ना माझ्या हिम्मतीवर त्यातुन मार्ग

नाही मार्गक्रमण करणार मी दुसऱ्यांच्या मतांप्रमाणे

मनाविरुद्ध माझ्या भावनेचा गळा दाबून

अडचण वेगळी प्रत्येक वेगळया अस्तित्वाची

संकटेही नसतात अगदी तंतोतंत सारखिच


जगु दया मलाही माझ्या मन-मतांप्रमाणे

नकोय ते ओझे जबरदस्तीचे लादवुन घेणे

गुदमरतोय श्वास चालताना अपेक्षांच्या ओझ्याखाली

नकोय अशी वागणुक मी म्हणजे काहीच नाही

वय, अनुभव, परिस्थिति, काळवेळ प्रतेकांचे भिन्न

आहे सगळयांमधलीच एक वेगळी मी व्यक्ति


कधी कमी वाहिवाट अनुभव जास्त काटेरी

संकटांवर मात करुन आयुष्याला पुरतील एवढे

तर कधी जास्त वहीवाट अनुभवनंच कमी

वाट ,अनुभवही वेगळा कसा लागु पडेल?

सपशेल नाकरताय माझं मीच असणं

ओरडून ओरडून का सांगवं लागतंय स्वत्व?


माझ अस्तित्व माझं नाव असं पूसुन नका टाकू

आत्मसन्मान ,आदर माझाही आहेच इतरांसारखा

आहे मनगटांत ताकद आणि संयम लढण्यासाठी

आहे हिम्मत अस्तित्व , मी पण सिद्ध करण्याची

जपेन मी माझं अस्तित्व कोणी जपेना का ?

चालत राहीन पायवाट अस्तित्वाची निरंतर


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational