STORYMIRROR

Bharati Sawant

Inspirational

3  

Bharati Sawant

Inspirational

अशी असावी कविता

अशी असावी कविता

1 min
653



कविता हवी लोभस

की हरवूनच जावे

शब्दांवरच्या प्रेमाने

अस्तित्वच विसरावे


तुका नामा ज्ञाना यांची

अभंगवाणी वदावी

संतसज्जनांची वाणी

अमूल्य होऊन जावी


असावी फुलांसमान

मृदू कोमल हळवी

प्रसंगी तलवारीची

तळपती धार व्हावी


कवितेने व्हावे धुंद

थोडेसेच संमोहित

निसर्गाचे गुणगान

मने करुनि मोहित


रेशमी धागे गुंफून

श्रुंगारात्मक रचना

आईबाबांसाठी नकॊ

कडू शब्दांची वल्गना


रात्रंदिवस चालावी

इथे मैफिल काव्याची

नशा चढावी श्रोत्यांना

तिच्या अमृतपानाची


काव्यगायनाने फुटे

अंकुर मातृगर्भास

संस्कारांचे बाळकडू

पिणारे यावें जन्मास


काव्यस्पंदने पोचावी

थेट काळजात खोल

भंगलेल्या हृदयाचे

ओळखून जाऊ पोल


ह्ळुवारशी फुंकर

देऊन गोड हुंकार

मांगल्य राखू शब्दांचे

नसे वृथा अहंकार


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational