असे कसे जगता तुम्ही
असे कसे जगता तुम्ही
जळत जळत जगता की, छळत छळत
इतरांच्या आयुष्यात राहाता का तुम्ही लुळबळत?।।
जगा मनमोकळ्या मनाने हसत आणि हसवत
चंदनासम झिजाव सर्वत्र सुगंध दरवळत।।
जगता कसे तुम्ही चेहर्यावर चिंतेचा मुखवटा लावून
आनंदाचे अत्तर उडवत बघाव एकदातरी जगून।।
पाण्यासारख असाव जीवन प्रत्येक रंगाला घ्याव सामावून
कधीतरी इतरांच्या आनंदात बघाव आनंदी होऊन।।
कसे जगाव याच असत गणित
नेहमी गुणगुणत राहावे जीवनाचे संगीत।।
