STORYMIRROR

Abasaheb Mhaske

Abstract Others Inspirational

2  

Abasaheb Mhaske

Abstract Others Inspirational

अर्थालाही अर्थ असावा

अर्थालाही अर्थ असावा

1 min
2.6K


अर्थालाही अर्थ असावा .

अर्थ असावा कामापुरता 

अर्थार्जनासाठी अनर्थ नसावा 

 

अर्थानेही सार्थ व्हावे समग्र जीवन 

अर्थानेही परमार्थ व्हावा थोडाबहुत ...

तरच अर्थ असे अर्थाला ...

अर्थाने सारे अनर्थ टळावे 

खऱ्या अर्थाने समर्थ व्हावे 

तेंव्हाच अर्थ असे अर्थाला

 

अर्थ असावे केवळ जगण्याचे साधन 

अर्थासाठी मानव नसे, मानवासाठी अर्थ  

कळले ज्याला,अर्थ असे ,त्याच्याच जगण्याला...  


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract