STORYMIRROR

Manisha Awekar

Abstract

4  

Manisha Awekar

Abstract

अफाट पाऊस पडे सारखा

अफाट पाऊस पडे सारखा

1 min
82

मूळ कविता -  रिमझिम पाऊस पडे सारखा यमुनेलाही पूर चढे


मूळ कवितेचे कविवर्य पी सावळाराम यांची क्षमा मागून विडंबन कविता सादर करीत आहे.


अफाट पाऊस पडे सारखा 

धरणांनाही पूर चढे

खड्डेच खड्डे चहूकडे गं बाई 

गेला रस्ता कुणीकडे

अफाट पाऊस पडे सारखा (1)


खड्डे कसले हे गतिरोधक

त्यात साठले मुठेचे जल 

वाहता जल ते ओसंडूनही

तारांबळ ती आमची उडे गं बाई

गेला रस्ता कुणीकडे

अफाट पाऊस पडे सारखा  (2)


खड्डे चुकवा, रस्ता शोधा

त्यात ऑफिसची वेळही गाठा

इकडे तिकडे तोल बिघडता

मिळेल बक्षिस प्लँस्टरचे गं बाई 

गेला रस्ता कुणीकडे

अफाट पाऊस पडे सारखा  (3)


दुचाकीच्या त्या लख्ख दर्पणी

मोटारची ती मुक्त फवारणी 

रडकी त्याची स्वारी बघुनी

खड्डयांनाही ऊर फुटे गं बाई

गेला रस्ता कुणीकडे

अफाट पाऊस पडे सारखा (4)


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract