अनोळखी
अनोळखी
अनोळखी वाटेवर कधी
मनात चिंता वाटते
काळोखाचे मळभ कधी
अंतर्यामी दाटून येते...! १
अनोळखी चेहेरे कधी,
क्षणात आपलेसे होती
ओळखीचे असूनही कधी
क्षणात परके वाटती...! २
थकून जाते पाऊल जेव्हा,
नसे रस्त्यावर चाहूल,
मार्ग एकटा अनोळखी
पडे अंतर्यामी कधी हूल...! ३
दिशाहीन होता होडी,
मन-नावाडी गोंधळतो,
हाक मारूनी करीता धावा,
परी किनारा ना सापडतो...! ४
कोण ओळखी,कोण अनोळखी,
माझे मला न कळते,
जीवनाच्या वाटेवर कधी
अर्ध्यावर एकाकी पडते...! ५