स्वातंत्र्य
स्वातंत्र्य


फक्त स्वातंत्र्य नको तर
स्वतंत्र विचारधारा हवी आहे,
सर्वत्र सुख,शांती आणि
समृध्दी स्थिरताही हवी आहे...
नकोत नुसती देशभक्तीपर गीते
देशाबद्दल तळमळ हवी आहे,
उगवणार्या प्रत्येक सुर्योदय आणि
सुर्यास्ताला प्रेमगीत हवे आहे...
जात-पात,उच्चनिचतेचे दवबिंदू नकोत
एकात्मतेचा रिमझिम पाऊस हवा,
एकमेकांना सौदार्हाने फुलवणारा
बंधुत्वाचा आल्हाद गार वारा हवा...
फक्त स्वातंत्र्य शब्दांपुरते,उपभोगण्यापुरते नको
त्यातला गभितार्थ हवा,
तिमिरातून तेजाकडे नेणारा
मार्ग त्यातून दिसायला हवा...
स्वातंत्र्याचे वारे वाहण्यासाठी
सारी सृष्टी तयार असते,
खर्या स्वातँत्र्यात राहण्यासाठी मात्र
दृष्टी विश्वासाची हवी असते...
असे स्वातंत्र्य हवे मला...
असे स्वातंत्र्य हवे मला....!