विवाह...
विवाह...

1 min

163
भारतीय संस्कृतीत
एक संस्कार आगळा
सोळा संस्कारामध्येच
असे विवाह सोहळा... १.
दोन घराण्यात जोडी
बंध रेशीम नात्यांचे
मंगळसूत्रासवे शोभे
कुंकू भाळी ते वधूचे... २.
सप्तपदी चालताना
श्वास-श्वास ते मोजती
अलवार पद पडे
असे आयुष्य गुंफती... ३.
भांगातले कुंकू तिच्या
असे शोभुनी दिसते
सौभाग्याचे चिन्ह कसे
पालखीच मिरवते... ४.
ठिबकते ओंजळीत
पाणिग्रहणाचे पाणी
एकमेकासाठी सारे
हक्क कुठला तो आणि ... ५.
सूर्य किरण पहिले
जणू आगळे पडते
निरागस तशी पुन्हा
मागे बंधन ठेवते... ६.