स्वप्न
स्वप्न

1 min

154
सांज धुंद वेडी,
गुलाब गालावर उमलले..
जसे.! स्पर्शता पाकळ्यांना,
निरव शब्द बंद जाहले...! १.
गोड छेड वार्याने,
बन वेळूचे थरारे..
किती झाकता शहारे,
आरक्त होशी लाजरे..! २.
तू प्रभेतली पौर्णिमा,
गंध-सुगंध हे लहरते..
आज ओठावर माझ्या,
तुझेच एक गाणे होते...! ३.
ह्या कोण...! लाटा,
मधु झंकारल्या तारा..
हे स्पर्श कसे.! जादुभरे,
...नि रोम-रोम शहारा...! ४.
मग उधाणली पुन्हा,
गंध वादळात वादळे..
वेग आवेगात बध्द,
दोन धागे गर्भात रूजले...! ५.
मी मंद कसे! हसावे,
मी धुंद कसे व्हावे..?
केशरातल्या पहाटेत सांग,
मज स्वप्न काय दिसावे...?!! ६.