यश
यश

1 min

191
प्रयत्नांच्या काठावर
एक मुक्कामाचे गाव
कष्टापुढे वसलेले
'यश' हेच त्याचे नाव... १.
जिद्द आणि चिकाटीचे
असतात दोन काठ,
यत्न आणि ध्येयाचीही
असावीच खास साथ... २.
सकारात्मकता मनी
गाठ पाडते यशाची,
जिद्द ठेवताच मग
पाठ ती अपयशाची ... ३.
यशापयशाच्यामध्ये
पूल असतो श्रद्धेचा,
प्रेरणेच्या खांबांनीच
जोड प्रवासी भावनेचा... ४.
कष्टानेही मिळे यश
सोने संधीचे करावे,
दूर सारून संकटे
त्याला खेचून आणावे... ५.
कुणालाही यश तसे
नाही मिळत सहजी
इच्छाशक्तीचीही लागे
करावीच हांजीहांजी... ६.
ज्याला ज्ञात इच्छा ठाव
मोल त्यालाच यशाचे
यत्न करणाऱ्यांलाच
बोल लागे प्रसिध्दीचे... ७.