स्वप्न
स्वप्न

1 min

183
माझ्या आशयाला जेव्हा,
परिमाण 'तू'ची व्हावे..
जाती लाजूनी मोतीही,
फिके पाचू रान व्हावे...! १.
साज..शृंगार...लावण्यं,
जस्से..! नक्षत्र झुकावे..
झंकारूनी मग सख्या,
स्वप्न शायरी ते व्हावे...! २.
खळाळत स्मित झरा,
मोतीयांनी उधळावे..
भारूनिया तारकांनी,
माझ्या अंगणी ते यावे...! ३.
स्वप्न गुलाबी माझे तू,
श्वास गुंतूनिया व्हावे..!
तुझे निश्चयी गान ते,
खास.. संग करा व्हावे...! ४.
असे भारूनिया श्वास,
सण...मिलनाचे व्हावे..
रात्र बहरूनी येता,
गर्भ सुखांनी धरावे...! ५.
अशा..लाजर्या क्षणांनी!,
पुन्हा पुन्हा न बोलावे..
धुंद वेड्या प्रितीत मी,
स्वप्न बिलोरी पहावे...!! ६.
स्वप्न बिलोरी पहावे...!!