STORYMIRROR

उत्तम गांवकर

Tragedy

3  

उत्तम गांवकर

Tragedy

जीवन कधी संपत नाही

जीवन कधी संपत नाही

1 min
248

तू निघून गेलीस म्हणून 

काही फरक पडत नाही

आठवण येते खूप _खूप पण

तुझ्यावाचून अडत नाही 

कोण म्हणतो उन्हामधे

पाऊस कधी पडत नाही 

सुक्या लाकडा सोबत का?

ओले लाकूड जळत नाही 

मानतो मी कधी 

जुने नाते संंपत नाही 

म्हणून का कुुुुणी

नवे नाते गुंफत नाही 

दगा दिला म्हणून कुणी 

जीवन कधी संपत नाही 

निष्पाप आहे मन माझे 

वाईट कुणाचे चिंतत नाही 

कोण समजून सांगेल तुुला 

प्रेेेम म्हणजे गंमत नाही 

प्रेम खरे असले तर 

तोडायची कुुणाची हिंमत नाही

धडा शिकलो तुुझ्याकडून

म्हणून कुणात गुंंतत नाही


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy