राज्य
राज्य


अखंड विश्वाच्या पसार्यात,
एकदा भास झाला विधात्याला
असंख्य ग्रहांपैकी पृथ्वीला त्याने आदेश दिला
की,पळामागून पळ सरकत काळ जसा
जाईल पुढे तशी वाढच होणार आहे यात..
आता तू तुझी गती वाढव,
कारण...माझ्या क्षुल्लक गतीनेही होईल
तुझे रुपांतर हजारो तुकड्यात..
काहीही नाव ठेव तू त्यांना
ते राहतील त्याच नावाने लाखों वर्षांपर्यंत..
या सार्या प्रक्रियेत मग,
विश्वकर्म्याच्या कष्टांचे काही थेंब पडले..
आणि त्यापैकी रुपांतर झाले काहींचे
जलमय पृथ्वीत तर काहींचे भूखंडात..
मग मनुष्यनिर्मित सरकारी यंत्रणेने
त्या तुकड्याला विविध रंग-ढंगांनी,
सीमारेषेंनी केले सुशोभित व त्याचे
संरक्षण करायला केले नामकरण
त्यांचेच नाव 'राज्य'!
आणि आपापल्या सोयीनुसार राहिले त्यावर
सत्ता चालवत.....!!