STORYMIRROR

Priti Dabade

Tragedy Others

3  

Priti Dabade

Tragedy Others

आधीची स्त्री

आधीची स्त्री

1 min
168

स्त्रीच्या डोक्यावर

असायचा पदर

काय बिशाद

उचलायची नजर


रांधा वाढा

उष्टी काढा

संसाराचा सतत

ओढायचा गाडा


ना करमणूक 

ना फिरणे

सगळ्यांसाठी नुसते

राबराब राबणे


शिक्षण घेणे 

असायचे पाप

काही बोलतांना

उडायचा थरकाप


चूल अन्

मूल चाकोरी

ना करायची

कुठली नोकरी


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy