राज्य...
राज्य...


देशाचा अविभाज्य घटक,
आणि एक राजकीय प्रणाली..
जनता अन सरकारला एकत्र
आणणारी एक नामावली... १.
माणूस आणि निसर्गाने,
खेळायचे ठरवलं जेव्हा..
राज्य पहिले घेतले,
निसर्गाने स्वत:वर तेव्हा... २.
लपायचे ठरवले पण,
त्यासाठी जागा शोधू लागला..
कुठे मिळेना अशी तेव्हा,
निवडले निसर्गाच्याच कुशीला... ३.
स्वस्थ बसेल तो माणूस कसला?,
निसर्गावरच करू लागला हल्ला..
जमिनीला केले नापिक आणि,
दुषित केले नदी-नाल्याला... ४.
निसर्गाची हिरवळ सारी,
इमल्यांसाठी तोडून टाकली..
मोकळ्या हवेविना मग,
पर्जन्याची वाट अडवली... ५.
पण निसर्गानेही मानवाला,
त्याच्या कृतीतूनच बजावले..
अश्रूवाटे त्याच्याच मग,
डोळ्यांना पाणी आणले...! ६.
निसर्गाचे राज्य आता,
भोग भोगणे सुरु झाले..
माणसाच्या हतबल कथा..
त्याच्याच कर्माचे फळ मिळाले..!! ७.