पौराणिक कथा
पौराणिक कथा

1 min

157
प्रबोधनात्मक असतात
छान पौराणिक कथा
कधी दर्शवती मानवासम
असती देव-देवतांही व्यथा... १.
बालकांनीही पाहिल्यास
मनावर होती सुसंस्कार
तसाच कधी ठावही घेती
मोठ्यांच्याही मनी हळुवार... २.
होता कधी मन उद्विग्न
जरूर पहाव्या पौराणिक कथा
त्यांत रमुनी आपोआप
होती हलक्या मनीच्या व्यथा... ३.
आजकाल मात्र सर्वत्र
दाखवती रौद्र रुप कथांचे
कसे पहावे सान-थोरांनी
भिषण रुप या विषण्णतेचे... ४.
यासाठी कधीही वाचाव्यात
पौराणिक कथा सार्यांनी
आत्मबोध होतोच मग
थोडा तरी अपुल्या जीवनी... ५.
सचित्र नि सपात्रशा
काल्पनिक सकारात्मकतेतुनी
मिळे मानवाला आधार
नकारात्मकता बाजूला सारूनी... ६.