विज्ञान कथा
विज्ञान कथा
कास धरली ज्ञानाची
सारी संकटे सारूनी
केला विकास आपण
आधुनिक तंत्रज्ञानांनी... १.
आस लागली विज्ञानाची
किती शास्त्रज्ञांना होती?
कैक शोध लावुनिया मग
आलेच नाना पर्याय हाती... २.
गेले सारेच झपाटून
अभ्यासू,ध्येय,चिकाटीने
शोध लाविले असे पोहचण्या
परग्रहावर जलदगतीने... ३.
ओतप्रोत ज्ञान घेत
बळ पंखात भरले
आधुनिक तंत्रज्ञानाने
अंतरिक्षी पोहोचले... ४.
आली उदयास क्रांती
होत प्रगती उत्तरोत्तर
अद्भुत विज्ञानाने असे
झाले किती चमत्कार... ५.
विज्ञानाचे अविष्कार
येते रूपे दोन घेऊनी
त्याच्या अतिरेकी वापराने
होते माणसाची कधी हानी... ६.
सारेच शक्य करते
हे विज्ञान घेत हाती
शक्यात विध्द होते
अज्ञान कोणी न राहती... ७.