Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Trupti Thorat- Kalse

Tragedy

3  

Trupti Thorat- Kalse

Tragedy

घुसमट मनातील माझ्या...

घुसमट मनातील माझ्या...

1 min
578


तू जेव्हा जाणुन-बुजून दुर्लक्षीत करतोस ना,

तेव्हा होते घुसमट मनात माझ्या.


माझ्या घरच्यांना सोडून; तुझ्या घरच्यांना आपलंसं करून

पण जेव्हा मी दुसऱ्याच्या घरातून आले हे ऐकायला मिळतं ना;

तेव्हा होते घुसमट.


काहीच चूक नसतांना आई-वडिलांचा मान जपण्यासाठी (तुझ्या)

आपल्या घरात पदोपदी अपमानित होते ना,

तेव्हा होते घुसमट.


घरच्यांना,मुलाबाळांना गरमागरम जेवू घालताना खरं तर खूप सुख मिळतं मला,

पण जेव्हा शिकून सवरून माझंच करिअर कुटूंबासाठी पणाला लावून"चूल अन् मूल"सांभाळते ना;

तेव्हा घुसमट होते.

                 

माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे; असं म्हणून नकळत माझ्या,

माझाच फोन चेक करतोस ना,

तेव्हा घुसमट होते.


कधी जुन्या आठवणी तू सांगतोस पण तेव्हा तू आपलं गाव,

आपल्या घरी म्हणायच्याऐवजी माझं-माझं करतोस ना

तेव्हा घुसमट होते.


बऱ्याचं गोष्टी मी फक्त तुझ्यासाठी ऍडजस्ट करते;

पण नेहमीचं तू मला गृहीत धरतो ना,

तेव्हा घुसमट होते.


मी सारं घर सांभाळून बरेचदा बाहेरचीही काम पहाते,

पण तू जेव्हा म्हणतोस ना'तुला काय? तू घरीच असतेस;

तेव्हा घुसमट होते.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy