विवाह
विवाह

1 min

201
होते अर्धांगिनी वधू
आणि सहचारिणीही
तिच्या जोडीदारासवे
नसे कमी ते काहीही...१
असे विवाह सोहळे
रम्य सुंदर सजती
नववधू वरासह
बंध रेशमी बांधती... २.
सुटे वधूचे माहेर
एका नव्या नात्यासाठी
ज्याची तुलनाच नसे
काय आणि कशा गाठी...? ३.
सप्तपदी मनामध्ये
पत्नी सतत आठवे
आणि पतीस सदैव
तशी मनात साठवे... ४.
तिच्या समर्पणातून
सारा संसार मांडते
सुखी संसारात तिच्या
नव्या स्वप्नात रमते... ५.
किती येवो अडचणी
तोंड धीरानेच देवू
दोघांमध्ये तयासाठी
खूप प्रेम ते साठवू... ६.