अनीती
अनीती


अनीती आणते पैसा
पैसा आणतो झगमगाट
येताना येतो त्यामागे
कित्येक जीवांचा तळतळाट.
क्षणाचे सुख मिळते
पण दुःख कायमचे
स्वाभिमान विकला जातो
लाचारी आवळी फासे.
अधिकारपद असताना
वागावे फार जपून
माप प्रत्येक क्षणाचे
चुकवावे लागते भरून.
क्षणाची मौज ठरते
अनंत काळाची शिक्षा
भ्रष्टाचाराच्या मार्गात असते
कायमच पापाची दीक्षा.
नीतीचा मार्ग खरा
करता याचा अवलंब
दिसत नसला प्रशस्त
नसतो कुणासाठीही स्वस्त...