STORYMIRROR

Manisha Wandhare

Abstract Romance

3  

Manisha Wandhare

Abstract Romance

अन् कापरा हा श्वास आहे ...

अन् कापरा हा श्वास आहे ...

1 min
5

क्षण क्षण तुझ्या नावे ,

दुराव्यातही हा भास आहे ,

मिठीत येण्या आसुसलेला ,

अन् कापरा हा श्वास आहे ...

पावला गणिक ठेका चुकतो ,

स्पंदनाना तरी आश्वास आहे ,

कुसवळता हिनवते चांदणे ,

ओसाड रात्र भकास आहे ...

तु बोललेल्या शब्दांवर ,

मी ठेऊन विश्वास आहे ,

तुझ्या येण्याची वाट पाहते ,

वचनांची धरून कास आहे ...

केशरी सांजेच्या उशाशी ,

धास्त दिवस निर्धास्त आहे ,

फुललेला श्वास माझा ,

क्षण आठवांचा दास आहे ...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract