STORYMIRROR

Chandan Pawar

Inspirational

3  

Chandan Pawar

Inspirational

अज्ञान

अज्ञान

1 min
569

ज्ञान दिले सावित्रीने

तरी सरस्वतीला पूजतो ;

शाळा उघडल्या जोतीबाने

देव दगडालाच मानतो.


वस्तीगृहात राहून शिकतो

नाक वर करून सांगतो ;

वस्तीगृह काढली शाहूंराजानी

तरी गोडवे व्यवस्थेचे गातो.


भीमरायाच्या संविधानामुळे

पंतप्रधान पदी पोहचतो ;

लाज कशी नाही वाटत

साईच्या दर्शनाला जातो.


शिक्षणाच्या अधिकारामुळे

आरक्षण , शिष्यवृत्ती लाटतो ;

अन मंदिरात जाऊन दगडी

देवाचे पाय चाटतो .


देवानं तुला पशुत गणलं

शिवबाने तुला माणसात आणलं

कर्मकांड न मानणाऱ्या शिवबास

देवाच्या पंक्तीत बसवलं.


शिक शिक शिकला तरी

अज्ञानातच जीवन जगतो ;

स्वप्रयत्नांनी मिळवले तरी

डोकं देवाच्या पायरीवरच टेकतो.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational