।।ऐक माझ्या मना।।
।।ऐक माझ्या मना।।
नको नको रे मना करुस त्रागा
देऊ नकोस राग,लोभास जागा।।
काढून टाक सारे गैरसमज
मग होईल जगणे सहज।।
देऊ नकोस अहंकारास थारा
जीवनी वाहतील सुखाच्या धारा।।
कटू वचनास बोलण्या आवर जरा
प्रेमभाव असू दे जवळ खरा।।
चिंतेचे काळे ढग दूर सार
मग मिळेल समाधान फार।।
मी पणाने होतो रे विनाश
मग शेवटी होशील हताश।।
नात्यांना तू मुकशील
लोक तुलाच हसतील ।।
ऐक माझे माझ्या मना
थोडा वेळ दे स्व चिंतना।।
शांती, संयम असू दे
प्रेमाचे रोप मनी उगवू दे।।
झाले गेले सोडून दे
दुःखाचे क्षण सोडून दे ||
आनंदाचे घन मनी जमू दे
सदैव हास्य ओठी असू दे ||
