STORYMIRROR

Manisha Awekar

Abstract

3  

Manisha Awekar

Abstract

ऐक जरा मानवा

ऐक जरा मानवा

1 min
230

सर्व जग माझ्या मुठीमधे

मानवाला वृथा होई गर्व

सर्वश्रेष्ठ निसर्गाहूनही

योग्य धडा शिकवी निसर्ग 


वृथा असा का हा अट्टाहास?

जन्म मृत्यू निसर्गाच्या हाती

चक्रीवादळे चक्रावणारी

कोविडपुढे शरणागती


स्पर्धेच्या युगात वेगाने धावे

किती सुखांना वंचित व्हावे?

भाव-भावनांना विसरावे

संधीकालामधे पस्तावावे


मीपणाच्या अट्टाहासापायी

विरली रेशमी नातीगोती

उदासल्या एकटेपणानी

कांचनसंध्येचे रंग विरती


नमून रहा निसर्गापुढे

नको उगा वृथा अट्टाहास

काही न चाले नियतीपुढे

जाणण्याचे घ्यावेस प्रयास


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract