अभिनंदन वर्धमान...!
अभिनंदन वर्धमान...!
विंचरून आला शत्रू भूमी
गडी बहाद्दर अभिनंदन
करकमलांनी यमसदनी धाडले
मांड ठोकुनी धडा शिकवून
डरकाळी अशी फोडली वाघाने
रडू फुटले भित्र्यांना
अवसान घातकी शत्रूला
भीक नाही घातली पठ्ठ्याने
नंगी तलवार मिशीची अन
दमदार नजर पाहून शत्रू घाबरला
नमते घेऊन नाद सोडुनी शत्रू
वर्धमानास घेऊनी सीमेवर आला
मान सन्मानासह नरवीर अभिनंदन
नन्दन भारत मातृभूमीचा घरी आला
सुस्वागत करूया आनंदाने
शौर्यास वंदूनी हर्षाने....!
