आयुष्य थांबले की
आयुष्य थांबले की
जगणे जगून घ्यावे
नको कलहाची वाट
आयुष्य थाबंले की
शरीर ही सोडेल पाट
आनंद गोळा करावा
नको भाडंणांची माळ
आयुष्य थाबंले की
उभा ठाकेल पुढे काळ
मनमुराद जगावे क्षण
पुन्हा पुन्हा न मिळणारे
आयुष्य थाबंले की
देहाला ना ते कळणारे
जोडा नवीन नाती
कळतील नवे संस्कार
आयुष्य थाबंले की
ना कळे कोणता आकार
भिती सोडा मनातली
निखळ जगणे शिका
आयुष्य थाबंले की
सरतील आणाभाका
