आयुष्य-एक सुंदर प्रवास
आयुष्य-एक सुंदर प्रवास
आयुष्य एक सुंदर प्रवास
सगळ्यांनी हसत जगलं पाहिजे
नव्या जोमात,नव्या उत्साहात
त्यालाही अनुभवलं पाहिजे
आयुष्य म्हणजे सुंदर वाट
जिच्यावरून चाललं पाहिजे
हाती घेऊनी हात तिचा
आयुष्यात प्रेम केलं पाहिजे
मित्र,नातलग,सगे-सोयरे
सर्वांच्या ध्यानी असलं पाहिजे
कुटुंबातल्या प्रत्येकाशी
आपुलकीने वागलं पाहिज
संसाराचा गाडा हाकताना
तिलाही वेळ द्यायला पाहिजे
पुन्हा एकदा जुन्या आठवणीत
धुंद होऊन रमायला पाहिजे
आयुष्यातल्या कठीण प्रसंगांना
धैर्याने सामोरे गेलं पाहिजे
गरूडभरारी घेऊन पुन्हा
उंच उड्डाण केलं पाहिजे
सारे काही स्थावर करून
स्वतःही थोडे जगायला पाहिजे
पुन्हा एकदा फिनिक्स पक्षासारखे
राखेतून जन्मायला पाहिजे
