आयुष्य एक रंग मंच
आयुष्य एक रंग मंच
जीवन असते एक पात्री नाटक
पण पात्रं असतात अनेक
ती सगळी एकलाच जगायचे असतात
चेहऱ्यावर रंग रंगकोटी ची गरज नसते
ना कुठली तालीम ना गाणी ना नृत्य
असतात केवळ नात्यांची बंधन
आपला, परका कोणच नाही कोणा सारखा
कधी लहान कधी किशोर तर
कधी जबाबदार नागरिक अंती
वार्ताख्यात बुडालेले निरर्थक जीवन
अन मग लक्षात येतं की आपण एवढ्या
पात्रांचा वापर फक्त स्वतःसाठीच करून घेतला
जगता जगता समाजाचा विचारच करायचा राहून गेला
फक्त मुखवटे बदलण्यात जिंदगी वाया गेली
फक्त मुखवटे बदलण्यात जिंदगी निघून गेली
