आठव क्रांतीकारकांचा
आठव क्रांतीकारकांचा
शिर तळहातावरी घेऊनी
लढले क्रांतीकारक त्वेषाने
स्वातंत्र्य मिळाले भारतदेशा
त्यांच्या अतुलनीय त्यागाने (१)
जीवन अर्पिले तयांनी
झोकुनी देशस्वातंत्र्यासाठी
घरदारावरी तुलसीपत्र
अर्पिले खुशीने देशासाठी (२)
आठव तयांचा येतो आहे
आज भारत स्वातंत्र्यदिनी
कितीही काळ लोटला तरी
कृतज्ञ अमर बलिदानी (३)
जीवन तयांनी समर्पण
देशासाठी अर्पियले
कृतज्ञतेचे स्मरण तयांना
वंदन करुनीया केले (४)
पेटवू क्रांतीची मशाल
आठव त्यांचा जागवूया
विचार क्रांतीचे मनी
सर्वजण बाणवूया (५)
