STORYMIRROR

Sanjay Gurav

Inspirational

3  

Sanjay Gurav

Inspirational

आशा

आशा

1 min
177

आशेवर जग चालते

आशा मनाआधी बोलते

आशा नसते साधीभोळी

आशा गुपितंही खोलते.


आशा चिरंतन जगती

ती उरतेच मरणांती

खेळ आशेचे अगम्य

आशेची कुठली गिनती?


आशा सर्वाचे कारण

आशा उत्तरा तारण

जिंकण्याआधीच जो तो

बांधी आशेचे तोरण.


बनवा आशेलाच सूत्र

तोडा निराशेचे सत्र

अशक्य काहीच नसते

"आशा" असावी मात्र.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational