आरोग्यमंत्र
आरोग्यमंत्र
जो पालेभाज्या खाईल,
तो सदा निरोगी राहील.
उसळ खाऊ मोडाची,
वाढ होईल हाडाची.
लाल भोपळा चांगला किसला,
रक्त शुद्धीकरणासाठी जेवणात वापरला.
गाजर आंबा पपई खा,
डोळ्यांना भरपूर तेज करा.
परसबाग ज्याच्या घरी,
आरोग्य नांदेल त्याच्या घरी.
मातेच्या जेवणात असेल पालक,
सुदृढ होईल तिचे बालक.
आवळा आणि संत्री,
आहेत दातांचे मंत्री.
भाजीपाला चिरल्यानंतर धुवू नका,
जीवनसत्व वाया घालवू नका.
भाजीपाला कडधान्य खाल्ल्यानंतर रोग होत नाही,
मग डॉक्टर कडे कशाला जायचं बाई.
