STORYMIRROR

Gaurav Daware

Drama Inspirational

3  

Gaurav Daware

Drama Inspirational

आरंभ

आरंभ

1 min
230

सुरुवात कर, शेवट होईलच....

आरंभ कर, अंत होईलच 


आता अंताची भीती कशाला

शेवटी तर मरायचच आहे 

आता हृदयाची धडपड कशाला 

शेवटी तर त्यालाही थांबायचंच आहे.... 


अरे हरला म्हणुन रडतोस कशाला 

जीवनाची सुरवात तर रडन्यानेच केली 

एकदा पडला म्हणून थांबतोस कशाला

धावन्याची सुरवात तर तूच केली..... 


धावू नको पण चालत राहा 

हरू नको पण चालत राहा...... 


लोक बघतील , तू चालत राहा 

लोक ओरडतील, तू चालत राहा 

अरे लोक मारतील, पण तू चालत राहा

लोक थकतील, तू मात्र चालतच राहा..... 


आयुष्य आहे मित्रा, हिमतीन जग

प्रयत्न छोटेसे, पण मरे पर्यंत कर 

तुझी सुरवातच तुजा आरंभ आहे 

तुझी मेहनतच तुजा प्रारंभ आहे..... 


तुझ्या डोक्यात वाघाचा आवाज वाजू दे 

तुझ्या हृदयात सिंहाची गर्जना जागु दे.... 


तू या सृष्टीचा अंत आहे मित्रा 

तुझ्या नंतर इथे काहीच नाही 

तू मानवाची घमंड आहे मित्रा 

तुझ्या नंतर फक्त तूच आहे.....


अरे जिकन्यासाठी तर सर्वच खेळतात 

तू मरण्यासाठी खेळ 

युद्धाला तर सगळेच घाबरतात 

तू मारून युद्ध खेळ.....


नको करू हरण्याचा विचार 

नको होऊ शत्रूसमोर लाचार 

तुझ्या हृदयात आग लागू दे 

तुझा बोलबाला जगात वाजू दे...... 


तू आहे या ब्रह्मांडाचा देवता 

तू आहे प्रत्येक कनाचा निर्माता 

अरे तूझ्यापासुनच सुरवात आहे 

आणि तूच या सृष्टीचा अंत आता...... 


अंताची नवीन सुरवात तूच 

सुरवातीचा शेवटही तूच 

तूझ्यापासुनच दुःख सुरु होत 

तुज्यापाशीच आनंद संपतो........ 


तू मानव आहे, गर्व कर 

विजयाचा काल तूच, गर्व कर 

शेवटच महाकाल ही तूच, गर्व कर...... 


हिम्मत ताकत मुठीत बांध 

अपयशाच्या पायऱ्याना लाथा मार 

मस्तकी तुझ्या त्रिभुवन आहे 

या सृष्टीचा निर्माता तुझ्यातच आहे......


तू सुरुवात कर, तुझा शेवट होईलच 

तू आरंभ कर, तुझा अंत निश्चित आहे.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Drama