STORYMIRROR

Prashant Shinde

Drama Fantasy

3  

Prashant Shinde

Drama Fantasy

आराम हराम है..!

आराम हराम है..!

1 min
13.5K


आळसावरती आळसातच

थोडी गम्मत केली

साखर झोपेची

दांडीच गुल्ल झाली


आराम हराम है ।आराम हराम है ।

असा चा नारा आला कानाशी

भरला मनाचा कोपरान कोपरा

संबंध जोडण्या श्रमाचा जीवनाशी


वाटलं आराम आराम नसता तर

आराम करा अस कोणी म्हंटल नसतं

आरामात जीवन जगण्याचं

स्वप्न कोणी पाहिलंच नसतं


सुदैवाने आराम भेटला

तर उगाच नाक मुरडायच

आपसूक साखर झोपेत

मिळणाऱ्या आनंदी आरामाला का सोडायच..?


भल्या भल्यांना आराम भेटत नाही

अठरा अठरा तास तो दिसत नाही

भाग्यवन्त आम्ही लेकरे देवाची

सौभाग्याची साखरझोप घेतल्यावाचून रहात नाही


आराम आरामच आहे

हे पटते मला साखर झोपेत असताना

आनंदाची विश्रांती घेऊन

पुन्हा ताजे तवाने होऊन आळस देताना...!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Drama