आनंदाचा नवरात्रोत्सव
आनंदाचा नवरात्रोत्सव
आनंदाला आला पूर
उत्साहाने भरला उर
नवरात्रीचा करू मोठा थाट
नऊ दिवसांच्या नवरात्रीने फुलली फुलांची वाट
पूजा घटाची घराघरातून पेरले जाते धन
विजयाची माळ घालाया आतुर होते मन
खणानारळाची ओटी, हिरवा चुडा, नेसवू पैठणी
लांबसडक केसात माळू वेणी, घालू पायात जोडवी
डोळ्यात येते आनंदाने पाणी बघुनी मनमोहक सुंदर रुप
आरती करायला आनंद होतो खूप
प्रसाद तो खिरापत बत्तासे लाह्या
सोडव माते संसारातील मोहमाया
भक्तीचा तो वाहात राहू दे झरा
नवरात्रीच्या उत्सवाने आनंद येतो घरा
