आंधळे प्रेम हास्य आठोळी
आंधळे प्रेम हास्य आठोळी
उडणारे केस माझे ते
तुम्हाला किती आवडत होते !
भाजीत निघाला एक
का मला दाखवत सुटले ?
आवडतात म्हणून काय
भाजीत केस वाढायचे ?
लग्ना आधीचे आंधळे प्रेम
लग्नानंतर असे डोळस झाले !
