STORYMIRROR

Sanjay Gurav

Inspirational

3  

Sanjay Gurav

Inspirational

आमच्या गावाकडे...

आमच्या गावाकडे...

1 min
178

रीत जगण्याची आगळी अन्

प्रीत गावरान फुलते आमच्या गावाकडे


आई-बापाच्या मुखावर हासू

जित कष्टाची डोलते आमच्या गावाकडे


झुडूप काटेरीही ना तुटते व्यर्थ

रानमेव्याची श्रीमंती आमच्या गावाकडे


सडा रांगोळी अंगणी सुहास्यवदनानी

चांदणभोजनाची पंगत आमच्या गावाकडे


जीव रमला शहरात तरीही मन कसे रमावे?

पावले वळतात आपसूक आमच्या गावाकडे


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational