आमच्या आईसाहेब.....
आमच्या आईसाहेब.....
कुटुंबाचा क्षण जपणारी आहे माझी आई
थोडया अलवार पण प्रेमाने जपते ती माई
माझ्या तोडक्या प्रश्नात माझी चूक काही नाही
पण प्रत्येक उत्तराला ती बनते माझ्या शब्दांची शाई
तिच्या अबोल उत्तरांना मी मानलंय पुण्याई
कारण उत्तरात समज तिच्या असतो ठाईठाई
माझ्या प्रत्येक अडचणीचा मीच पापी वाही
पण अडचण सोडवण तिला कस जमत मला हे कळतं नाही
माझी कोणतीही अडचण तिची केवळ ग्वाही
थोडा विचार करून ती लगेच उत्तर मला वाही
कसा विचार करते मला तर काही समजत नाही
पण माझी अडचण दूर होते ही तिचीच पुण्याई
थोडया अलगतपणे आम्ही घेतो तिचीच शिष्याई
बाबा दादा आणि मी मानलंय तिलाच देव माई
कारण तिच आमच्या प्रत्येक समस्येच उत्तर देई
काय जादू करते याची आम्हाला काही खबर नाही
खरंतर आमची आई नेहमी आम्हाला प्रेरणा देई
पण तिच्या प्रेरणेच रहस्य आम्हाला माहित नाही
कधी विचारावं रहस्य तर थोडं वाटते भीती बाई
कारण रागावण्यात तर आमची आई हिटलरलाही चार शब्द सुनवून येई.
