STORYMIRROR

Sanjay Raghunath Sonawane

Inspirational Children

3  

Sanjay Raghunath Sonawane

Inspirational Children

आनंदी पाऊस

आनंदी पाऊस

1 min
419

आले काळे ढग नभात 

गार वारा जोराने सुटला 

तप्त उन्हाच्या ज्वाला 

तो दूर घेऊन गेला 


लाभला थंड गारवा 

आशा पल्लवित झाल्या 

त्याच्या सुसाट येण्याने 

दारे,खिडक्या वाजल्या 


त्याचा किती सुखद गारवा 

आल्हाद दिला जीवाला 

सारे दु:ख पळाले 

जीव मोकळा झाला  


वीज कडाडली जोराने 

लख्ख प्रकाश धरतीला 

काळोखात दिवे पेटले 

क्ष्णोक्षणी लपंडाव चालला 


सारी धरती आनंदली 

झाडे आनंदाने नाचली 

तिच्या कुशितले सोबती 

गाणी स्वरात गाऊ लागली 


आल्या पाऊसाच्या धारा 

शेतकरी खुष झाला 

ओल्या मातीच्या कुशित 

बीज पेरण्या लागला 


अशी पाऊसाची साथ 

नशिब त्याचे उजळते 

हिरव्या पिकाचे शिवार 

त्याच्या मनी रंगते 


असा येतो जोराने 

रोगराई घेऊन जातो 

सारे रस्ते जगाचे 

स्वच्छ करूनी देतो 


सप्त रंगाचे इंद्रधनुष्य 

मौल्यवान अनमोल धरतीला 

आकाशात चौफेर आकर्षण 

घालते भुरळ मनाला 


असा दिलदार मनाचा 

पुरवितो पाणी मानवाला 

तोच अखंड ठरला जीवन 

सजीव सृष्टी वाचविण्याला


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational