बालकविता
बालकविता
1 min
202
प्राण्यांचे पाहू नाना चित्र
ओळखू या त्यांचे चरित्र
सिंह राजा जंगलाचा
थरकाप उडतो मनाचा
वाघ आहे राष्ट्रीय प्राणी
पाहून होते पाणी पाणी
हत्ती आहे सर्वात शक्तिमान
तोच वाटतो मला बुद्धिवान
उंच मानेचा असतो जिराफ
दुरवरचे दिसते सारे साफ
हरीण सर्वात चपळ पळणारा
त्याहून नाही कोणी धावणारा
कोल्हा म्हणजे धूर्त प्राणी
दिसता काकडी तोंडात पाणी
हिमालयात दिसला गेंडा
त्याच्याजवळ लावू झेंडा
अस्वल प्राण्यांवर फारच केस
पाहताक्षणी तोंडाला येतो फेस
राष्ट्रीय पक्षी रंगबिरंगी मोर
नृत्य पाहून होते मनविभोर
