सोन्याची गुहा
सोन्याची गुहा
सैर करताना जंगलात
गुहा पडली नजरेत
विचार केला पुन्हा
पहावी तर गुहा
हळूच केला शिरकाव
धरून मनात हाव
मोठेमोठे हंडे होते
सोन्याने भरले होते
झाले सारे चकित
पण थोडे भयभीत
हिरे, पाचू , मोती
वेचू तरी किती
भरता येईल जेवढं
घेतलं भरून तेवढं
साऱ्यांनी मजा केली
जंगलसफारी सार्थक झाली
आनंदाचा दिवस होता
अविस्मरणीय ठरला होता
