STORYMIRROR

Bharati Sawant

Fantasy

3  

Bharati Sawant

Fantasy

सजली धरणी माय

सजली धरणी माय

1 min
265

तापलेली धरणी माय 

पर्जन्याच्या सरींनी न्हाली

 नेसूनी हिरवा शालू

 जणू नवरीच आज जाहली ||१||


 लग्नमंडप आज सजला

 छान हिरव्या रंगानी 

सजुनी नाना फुले-पाने 

खुलूनी दिसे अंगानी ||२||


इंद्रधनुष्याच्या रंगाची 

रोषणाई शोभे छान 

ढगांचा कडकडाटात जणू 

ढोल ताश्यात गुंजे रान ||३||


दवाचे मोती सफेद 

जणू अक्षता डोईवरी 

वाऱ्याची मंद लहर 

जशी बासुरी मुग्ध करी ||४||


डोंगरातुनी वाहणारे झरे 

आकर्षित करी मन 

पाहुनी झाले तृप्त नयन 

हेच आयुष्यातले धन ॥५||


Rate this content
Log in

Similar marathi poem from Fantasy