STORYMIRROR

Bharati Sawant

Inspirational

2  

Bharati Sawant

Inspirational

भावना शब्दातून

भावना शब्दातून

1 min
84

कामाच्या व्यापातून 

आज मिळाली सवड

म्हटले जरा जोपासावी 

माझी जुनी आवड||१||


हातात घेतली लेखणी 

कागदावर उतरले शब्द 

सैरावैरा पळे अक्षरे

झाले मीच स्तब्ध||२||


भाव त्यांचे रुसल्यापरी

म्हणे आज झाली का आठवण 

नाही बसवणार कवितेचा मेळ

अक्षरांची करणार पाठवण||३||


मी म्हटले नकोस रुसु

होती थोडी कामात व्यस्त 

आज जशी तुझ्याशी बोलुनी 

वाटे माझे मला मस्त||४||


भेट आपली जीवनात 

घडत असते नित्य

भावनांच्या खेळात मज

कधी होता येत नसे व्यक्त||५||


प्रेम, राग, आनंद,

सर्व भावनिक सदिच्छा 

शब्दानेच कळतात

एकमेकांच्या इच्छा||६||


शब्दांची साथ जीवनात

आहे श्वास असे तोवर 

भाव व्यक्त करुया

जीवन आहे जोवर||७||


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational