एक नातं असं असावं....
एक नातं असं असावं....
एक नातं असं असावं,
हृदयात त्याचा गंध बसावा
न बोलता शब्द मनातले ,
एकमेकांना कळावे सगळे..... १
प्रेमापलिकडे काहीच नसावे
रुसव्या-फुगव्यातही प्रेम असावे,
आपुलकीचे रोप असावे,
एक नातं असं असावं..... २
नात्यात नको कधी दुरावा,
गोष्टी सगळ्या बोलून सोडवाव्या,
अविश्वासाचे बिज कापून टाकावं,
एकमताचं एक नातं असावं..... ३
भीती असावी साथ गमावण्याची
ओढ़ जशी चकोराला चांदण्यांची
लखलख प्रकाशाने उजडून निघावं,
एक नातं असं असावं..... ४
निराशेतून आशेचा किरण असावा
एक अबोल तर दुसरा बोलका असावा
संकटात हातात हात घालून लढावं,
एक नातं असं असावं.....५
एक नातं असं असावं,
नाही ते कोणाला ओझं वाटावं
ठामपणे पाठीमागं उभं राहावं,
एकटं कधीच न पाडावं..... ६
एक नातं असं असावं,
प्रेमाचा ते सागर असावं
शांती ज्याच्या कुशीत मिळावी,
प्रत्येक जन्म त्याची आस असावी ,
एक नातं असं असावं....... ७

