STORYMIRROR

Bharati Sawant

Others

3  

Bharati Sawant

Others

गणेश वंदना

गणेश वंदना

1 min
361

गौरीपुत्रा गजानन 

आमुचा तुच आराध्य 

लाडू, मोदक तुझा नैवेद्य 

अशक्य गोष्टी करी साध्य ||१||


सकलांचा तुच आहे धनी

पिवळा पीतांबर शोभे तनी

संकटी भक्त करी धावा 

वसे तुच प्रत्येकांच्या मनी ||२||


गाऊ तुझे किती गुणगान 

कंठी शोभे माळा छान 

विद्यची आहेस तुच खाण 

असतो अग्र तुजला मान ||३||


आहेस जगाचा तूच दैवत 

सोपविले तुझ्यावर त्यांचे दैव 

हाकेला सदा तु पावसी

तारी तुझ्या भक्तांन सदैव ||४||


भक्ताना तुझीया देवा

कायम असाच पाव 

तोडूनी त्यांचा स्वार्थाचा हाव

जागव हृदयी भक्तिभाव ||५||


Rate this content
Log in